धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी भरीव तरतुद तसेच रेल्वे प्रकल्पासाठीचे भुसंपादन माझ्याच कारकिर्दीत झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी विजेची सुविधा मिळावी यासाठी 1303 कोटी 70 लाखाचा निधी मंजुर केला आहे. रस्ते विकासासाठी सुध्दा हजार कोटीपर्यंत निधी आणलेला विरोधकांना दिसत नाही असा पलटवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमरगा व तुळजापूर तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत केला.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना ते मंजुर करुन घेतले आहे. काही महिन्यात तिथ तिसरी बॅच देखील सुरु होईल. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी उध्दवजी मुख्यमंत्री असताना 2206 कोटी रुपयाचा भरघोस निधी दिला आहे. 1303 कोटीपैकी वितरण केले आहे. 673 कोटीतून व्यवस्थेच्या आधुनिकीकरण, 300 कोटी मधून मीटर बसवण्यात येणार आहेत. 125 कोटीतून फिडर सेपरेशन, 204 कोटी वीज चोरी रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहे. वीज वितरणाचे आधुनिकीकरण व संपूर्ण प्रणाली मजबूत करण्यासाठी 673 कोटी 83 लाख रुपयांची नियोजन केल्याचे खासदार ओमराजेनी सांगितले.जिल्ह्यात 40 ठिकाणी पाच एम एस क्षमतेचे उपकेंद्र तसेच ज्या ठिकाणी पूर्वी उपकेंद्र आहेत अशा 38 उपकेंद्रांमध्ये पाच एमचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. उपकेंद्रात ट्रांसफार्मरची क्षमता पाच एम व्ही ए वरून दहा एम व्ही ए एवढी क्षमता वाढ होणार आहे. एक हजार 945 किलोमीटर उच्च दाब वाहिनीचं जाळ असुन जिल्ह्यात दोन हजार 250 ठिकाणी नवीन रोहित्र तर दिड हजार 50 डीपीची क्षमता 63 वर करण्यात आली आहे.
78 ठिकाणी कॅपॅसिटर बँक, 49 किलोमीटर आवरण असलेली तार बसविण्यात आली. जिल्ह्यात एकशे तेरा ठिकाणी फिडरचे विलगीकरणासाठ 125 कोटी रुपयाची तरतुद केल्याचे राजेनिंबाळकर यांनी सांगितले. रस्ते विकासाचा विचार केला. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 27 कामासाठी 134 कोटी निधी आणला. तर पंतप्रधान सडक योजनेंतर्गत 133 किलोमीटरचे रस्ते करणेसाठी 89 कोटीचा निधी मंजुर केला आहे. तसेच तुळजापुर- नळदुर्ग रस्त्याचे 10 मीटर रुंदीकरणासाठी 183 कोटी निधी मंजुर केला असुन त्याची निविदा प्रक्रीया देखील सुरु झाली आहे. नळदुर्ग- अक्कलकोट मार्गाचे काम चालु असुन त्यावर 274 कोटी रुपये खर्च होणार आहेत.