नांदेड (प्रतिनिधी)- डायट नांदेड येथील माजी विषय सहायक तथा जिल्हा परिषद शाळा धारेगाव येथील शिक्षक संतोष केंद्रे यांना 16 मार्च रोजी शिलाँग(मेघालय) येथे आयोजित आखील भारतीय बाल इसाहित्य स्पर्धेत 'ऑक्सिजन' या लघुपटासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.तसेच जिल्हा परिषद शाळा कन्या भोकरचे शिक्षक श्री मिलिंद जाधव यांच्या ऑडिओला ज्युरी अपरिशियशन हा राष्ट्रीय पुरस्कार मेघालय सरकारचे शिक्षण मंत्रीश्री.रकम पी.संगमा व श्री.प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी एन सी इ आर टी दिल्ली,श्री अर्मेंद्र बेहरा सहसंचालक सी आय इ टी,एन सी इ आर टी,दिल्ली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

'ऑक्सिजन' हा लघुपट वाढत्या प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर भाष्य करणारा आहे. यात भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणींचे चित्रण करण्यात आले आहे. केंद्रे यांनी हा पुरस्कार त्यांचे दिवंगत पिता यांना समर्पित केला आहे. यापूर्वीही त्यांना 'भूक' आणि 'बदल' या लघुपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया:

हा पुरस्कार मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातही असेच दर्जेदार लघुपट बनवण्याचा प्रयत्न करेन,“ असे केंद्रे यांनी पुरस्कारानंतर प्रतिक्रिया दिली.


जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन:

नांदेड जिल्हा प्रशासनाने दोन्ही शिक्षकांचे पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांनी यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र राज्याचे नाव देशभरात उजळले आहे.


 
Top