धाराशिव (प्रतिनिधी)-सहाय्यक संचालकपदी रोहन शिवाजीराव जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग एक या पदासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने रोहन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार राजा वैद्य, इकबाल पटेल व व माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव व परिवार उपस्थित होता. रोहन जाधव यांचे संपूर्ण शालेय शिक्षण धाराशिव शहरांमध्ये झालेले आहे. एक होतकरू तरुण सध्या नगरपालिकेत कर निरीक्षक या पदावर कार्यरत असणारा नोकरी सांभाळून राज्य आयोगाच्या वर्ग एक पदाला त्यांनी गवसणी घातली आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून रोहन जाधव यांचे कौतुक होत आहे. सत्कार प्रसंगी संजय पाटील दुधगावकर यांनी रोहन यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या


 
Top