धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक सेल प्रदेश प्रमुखपदी खालिल सैफ सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने व प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटन विभागाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. खालील सैफ सय्यद हे काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी असून ते जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. या निवडीचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून सय्यद यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top