धाराशिव (प्रतिनिधी)-अभियांत्रिकीच्या निकाला नंतर काही विषय गेल्याने नैराशयातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जेवळी (ता. लोहारा) येथील त्या अपंग विद्यार्थिनींचा अखेर मंगळवारी (ता. 19) पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले झाला आहे. शिकण्या-घडण्याच्या या लहान वयात अपयशाच्या भीतीने विद्यार्थींनीने मृत्यूला कवटाळल्याच्या या घटनेने परिसरात चिंता व हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की जेवळी (ता. लोहार) येथील रेणुका बालाजी साळुंखे ही जन्मजात अपंग (दोन्ही पाय) होती. तीच पाहीले ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे दिव्यांग निवासी शाळा सास्तूर (ता. लोहारा) येथे झाले आहे.

रेणुकाचे वडील जिप चालक असून पालकाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आपल्या मुलीला तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षण द्यायचं या विचाराने बारावी नंतर यावर्षी रेणुका हीला पुणे (धनकवडी, कात्रज) येथील भारतीय विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश दिला होता.

सर्व व्यवस्थित चाललेल असतानाच आता अभियांत्रिकी प्रथम वर्षातील पहिल्या सेमिस्ट्रीचा निकाल लागला. यात काही विषय राहिल्याने रेणुका निराश होती. या नायराशेतूनच तीने गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी वस्तीगरातच जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास पन्नास टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती. अखेर मृत्यूची झुंज देत असताना मंगळवारी (ता. 19) सकाळी आठच्या सुमारास तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


 
Top