भूम (प्रतिनिधी)-प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंचच्या वतीने भूम तालुक्यातील विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा सन्मान ग्रामीण रुग्णालय भूम येथे पालकमंत्री तानाजीराव सावंत व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंच संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी यशोधरी धनलोभे, पूजा रसाळ, आरती डमरे, मनीषा अंदुरे, सरिता साखरे, प्रतीक्षा कांबळे,अश्विनी विभुते, गीतांजली सीतापे आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान महिला शिकली तर पूर्ण घराची प्रगती होते. महिलांना पुरुषांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिले. वेळोवेळी मार्गदर्शन केले जावे. त्यांच्यावर जाचक बंधने लादली जाऊ नये असे मत सन्मानवेळी उपस्थित महिलांनी केले. तसेच प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंचचे आभार मानले. 

यावेळी  संस्थापक प्रभाकर शेंडगे, डॉ. गोसावी, डॉ. अविनाश भोरे, रामभाऊ खैरे, काळे, गणप्रमुख दत्ता काळे, शाखाप्रमुख श्रीहरी दवंडे, विकास बाबर, अमोल भसाड, विकास औताडे, पांडुरंग धस, रोहित भडके आदी मंचाचे पदाधिकारी व  महिला कर्मचारी उपस्थित होत्या.


 
Top