कळंब (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. श्वेता सुंदर कदम हिची प्रादेशिक निवड समिती कार्यालय कोल्हापूर( महाराष्ट्र शासन मुख्य वनसरंक्षक विभाग) या ठिकाणी वनरक्षक गट (क)या पदावर निवड झालेली आहे. 

ती छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सुंदर चंद्रसेन कदम या कर्मचाऱ्यांची कन्या असून ती महाविद्यालयाची गुणवान अशी माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव शिवाजी कापसे, संस्थेचे अध्यक्ष श्याम खबाले, संस्थेचे सहसचिव प्रा.संजय घुले, संस्थेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे, त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अविनाशजी मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत जाधवर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top