तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या जलोषात आगमन झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सुमारे बारा लाख रुपये खर्चुन नव्याने संभाजीनगर येते पुर्णाकृती पुतळा बनविण्यात आला. पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी 57 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुतळ्याचे संभाजीनगर येथुन शुक्रवार सकाळी छञपती शिवाजी महाराज पुतळा येथे आगमन झाले. तेथुन वाजतगाजत हा पुतळा आंबेडकर चौकात आणुन मुळ जागेवर विराजमान करण्यात आला. यावर पाकळ्यांची उधळण करण्यात आली. नंतर याचे पुजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी माजी नगराध्यक्षा संगिता कदम, विनोद गंगणे, सचिन रोचकरी, धिरज पाटील, रुषीकेश मगर, औदुंबर कदम सह सर्व पक्षाचे पदाधिकारी व आंबेडकर प्रैमी उपस्थितीत होते.


 
Top