धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, परंडा येथील दर्गा रोड येथुन भिमनगरकडे जाणारे रोडवर एक पिकअप  वाहन उभे आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून चेक केले. सदरील वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे दिसून आले. सदरील वाहनाचे निरीक्षण केले. वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. नमुद पिकअप मधील 16 वासरे असा एकुण 48 हजार रूपये किंमतीचे गोवंशीय वासरे सह पिकअप वाहन असा एकुण 5 लाख रूपये किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. त्यावरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 62/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम  कलम 11(ए)(डी) (ई) (एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ), 6, 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस उपनिरीक्षक घोंगडे, पोलीस हावलदार शेख, महिला पोलीस हावलदार पायाळे, पोलीस नाईक गुंडाळे, पोलीस अंमलदार सुर्यजीत जगदाळे, गायकवाड यांचे पथकांनी केली आहे.


 
Top