धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये शिवजयंती 2024 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 28 व 29 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .

यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने शिवाजी महाराजांवरील रांगोळी स्पर्धा , पारंपारिक व्यायाम अंतर्गत स्पर्धा यामध्ये काचपुरी ,पुलप्स, पुशअप्स ,रस्सिखेच, खो खो, क्रिकेट इत्यादी खेळांचे आयोजन केले होते .  त्यामध्ये मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यानंतर तुळजापूरचे कलाध्यापक श्री रमेश रेणके यांच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार श्री रवी केसकर आणि महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांच्या हस्ते  करण्यात आले . दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले .यामध्ये विद्यार्थ्यांची पारंपारिक वेशभूषेमध्ये वारकरी  दिंडी महाविद्यालयामध्ये काढण्यात आली .  त्यानंतर महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री सागर सलगरे यांचे संत तुकाराम महाराजांवरील कीर्तन आयोजित केले होते.

कीर्तनासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी व स्टाफ  बहुसंख्येने हजर होते. कीर्तनाच्या नंतर शिवपूजनाचा प्रमुख कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये प्रमुख पाहुणे पत्रकार श्री रवी केसकर व श्री रमेश रेणके  यांच्यासह प्राचार्य डॉ. विक्रमसिंहं माने ,डॉ. उषा वडणे , प्रा.प्रमोद तांबारे व विद्यार्थी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पूजा व आरती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिवस्तवण व छत्रपती शिवाजी महाराजांची महती याबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तांबारे यांनी केले.

या वेळी डॉ.उषा वडणे, रेणके, प्राचार्य डॉ. माने  यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे विभाग ,सर्व विभाग प्रमुख यांचे हस्ते विविध क्रीडा व कला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच महाविद्यालयातील 08 विद्यार्थ्यांना कमिंस इंडिया तर्फे न्यूट्रिंग ब्रिलियन्स ही स्कॉलरशिप मिळाली. त्याबद्दल या कंपनीच्या वतीने स्कॉलरशिप मिळालेल्या मुलांना कंपनीने प्रमाणपत्र व लॅपटॉप देऊन त्या सर्वांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .त्याशिवाय महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्कर्ष म्हात्रे व बांगड यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला  महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र माननीय पालकमंत्री यांचे हस्ते मिळाले आहे . या विद्यार्थ्यांचाही याच कार्यक्रमात पालकासह सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्रीडा क्षेत्रात आपल्या खेळाने नावलौकिक मिळविलेल्या 17 विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाचे विद्यार्थी  खोचरे, खांडेकर यांनी आंतरविद्यापिठीय क्रिकेट मध्ये राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. 

तसेच यावेळी महाविद्यालयात उल्लेखनीय कामगिरी केलेले प्रा. दर्शन ठाकूर, प्रा. पी एम पवार ,प्रा.संदीप टेकाळे यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर माने, प्रा. घळके, डॉ. वडणे प्रा. तांबारे ,डॉ.गणेश मते , प्रा.एस.एम.पवार, प्रा.पी.एम.पवार  कार्यालय अधीक्षक हेमंत निंबाळकर व सर्व कर्मचारी हजर होते. सर्व स्पर्धाचे नेटके आयोजन करण्यासाठी प्रा. सुनिता गुंजाळ, प्रा. आर एम शेख, प्रा बी एस चव्हाण, प्रा आर ए दंडनाईक, प्रा डी बी ठाकुर,प्रा एम व्ही जोशी, प्रा डि डि मुंढे, प्रा .आर बी रणदिवे, प्रा .डी डी भक्ते, प्रा.ऋतुजा काळे ,प्रा .भाग्यश्री माने यांनी विशेष परिश्रम केले. सदर कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवकालीन नाट्य सादर केले. त्यामध्ये विविध प्रसंगाचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करून शिवसृष्टीचा प्रत्यक्ष अभास सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आणून दिला.


 
Top