तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शाळेत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता 5 वी 7 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले. विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुलभा पवार, संतोष देशपांडे, गणपती येरकळ,शशिकांत देशमुख, गोरख चौरे,चंद्रकांत गिरे, वर्षा शेजाळ,उषा नाईक,प्रभावती मुंढे, रोहिणी हलसीकर,शकुंतला पांचाळ, लता बंडगर यांनी परिश्रम घेतले. 


 
Top