धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळच्या विद्यमाने पंधरावे अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलन शनिवार दिनांक 24, 25, 26 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदान, यवतमाळ येथे पार पडले या संमेलनात आजवरचे आंबेडकरी साहित्य क्षेत्रातील योगदान, कविता आणि बालकविता या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन संगराच्या पायवाटा काव्य पुरस्कार पंडित कांबळे यांना संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रणजीत मेश्राम, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. महेंद्र भवरे, उद्घाटक दिग्दर्शक माननीय संतोष संखद यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पहार व रोख रक्कम देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील उपस्थित होते.

पंडित कांबळे हे नगरपरिषद शाळा क्रमांक 14 धाराशिव येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे तीन कवितासंग्रह, तीन बालकविता संग्रह, चार संपादित पुस्तके, एक समीक्षेचे पुस्तक असे अकरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच त्यांच्या 45 संपादित कविता संग्रहात कविता प्रकाशित असून अनेक कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. त्यांच्या साहित्य लेखनावर अनेक नामांकित साहित्यिकांनी लेखन केलेले आहे.

पंडित कांबळे यांना संगराच्या पायवाटा हा काव्य पुरस्कार कुठलाही प्रस्ताव न देता मिळाल्यामुळे डॉ. अशोक इंगळे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. कैलास वानखेडे, डॉ. सारीपुत्र तुपेरे, लोकनाथ यशवंत, योगीराज वाघमारे,जयराज खुने या नामवंत साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. साहित्यिक, मित्र, नातेवाईक यांनी पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top