धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान, सन 2022 चा राहीलेला पीक विमा, सन 2023 चा पोक विमा सरसगट मिळावा. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व शत मालाला हमीभाव फायदा लागु करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी आयुक्त प्रविण गेडाम यांच्याक्कडे कली आहे.

संपूर्ण पावसाळ्यातील 115 दिवसांपैकी जिल्ह्यात 80 ते 85 दिवस कोरडे गेलेले आहेत. जिल्ह्यात एकूण 410 ते 428 मि. मि. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक असलेले सोयाबीन दीड-दोन क्विंटल प्रती एकर निघाले आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात कल्यामुळे सोयाबीनचे भाव 4300 ते 4600 दराने विक्री करावी लागली. त्यातच शेतकऱ्यांनी कशीबशी रब्बी पेरणी केली. आज हरभरासारखे मुख्य पीकाची काढणी झाली. त्यात एकरी एक ते दोन पोते तर कोणाला पेरलेल्या बीयाणाऐवढे उत्पन्न झाले. अशा परिस्थितीत शेतीचा जोडधंदा असणाऱ्या दुधाचे भाव रुपये 10 रुपयाने कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात 27 शेतकऱ्यांनी आर्थीक विवंचनेतून आत्महत्या केल्या आहेत. हे आत्महत्याचे चक्र थावविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव कायदा लागू करावा, संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकरी व शेतमजुरांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, दुष्काळी उपाययोजनाची सुरुवात करावी. धाराशिव, वाशी, लोहारा तालुक्याचे 208 कोटी दुष्काळी अनुदान तात्काळ मिळावे व उर्वरीत पाच तालुक्यांना दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी अनुदान ताबडतोब द्यावे. टेंभूर्णी-लातूर महामागाचे चौपदरीकरणाचे काम स्वरीत चालु करावे. मागील दोन वषार्पासून जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळणाऱ्या वित्त आयोगाचे 180 कोटी त्वरीत मिळावेत, आदी मागण्या येत्या चार दिवसात मान्य कराव्यात अन्यथा लोकशाही मागाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगांवकर यांनी निवेदनात दिला आहे.


 
Top