धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात 29 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 रोजी संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आयोजित महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात धाराशिव जिल्हा संस्कार भारती समिती देवगिरी प्रांत लोककला विधाप्रमुख डॉ. सतीश महामुनी, प्रांत चित्रकला विधा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली गोंधळ गीताच्या  सादरीकरणाची सुरुवात करण्यात आली.  

प्रथम देवीची आरती महासंस्कृती आयोजन समिती सदस्य युवराज नळे, उषा कांबळे, पर्यटनसमितीचे प्रा. अभिमान हंगरगेकर, शेख अब्दुल लतिफ आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर आई तुळजाभवानीचा गोंधळी नृत्यांने सुरुवात करण्यात आली या गोंधळ नृत्यात संस्कार भारतीचे कलासाध क पद्माकर मोकाशे, दिपक महामुनी, प्रफुल्ल कुमार शेटे, संदीप रोकडे, लक्ष्मीकांत सुलाखे, दिलीप महामुनी  अजय राखेलकर, सौ. अपर्णा शेटे. सौ. गीता व्यास ,सौ. माधुरी कनगरकर, जीवनराजे इंगळे, सौ. अंजली  विळेगावे, कु. सार्थकी वाघ ,दत्ता लोंढे, शेषनाथ वाघ, सतिश महामुनी, सोमनाथ कांबळे, बाळासाहेब पारडे आदि कलासाधकांनी सादरणीकरण केले. महासंस्कृती उद्घाटन प्रसंगी मान्यवर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,  उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार मृणाल जाधव, अभिनेता भरत जाधव, महासंस्कृती आयोजन समिती सदस्य आदि मान्यवर अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम महाराष्ट्र गीतांने सुरुवात जिल्हा संस्कार भारतीचे  कलासाधक पदाधिकारी अनिल ढगे, सुरेश वाघमारे सुंभेकर, श्यामसुंदर भन्साळी, प्रभाकर चोराखळीकर ,शरद वडगावकर , रवींद्र कुलकर्णी, अक्षय भन्साळी, अरविंद पाटील, दिलीप महामुनी, धनंजय कुलकर्णी,डॉ. सतिश महामुनी, शेषनाथ वाघ , लक्ष्मीकांत सुलाखे ,नितीन बनसोडे, दिपक महामुनी, चि. सत्य हरी वाघ,  प्रफुल्लकुमार शेटे यांनी व उपस्थित रसिकांनी हे राज्यगीत म्हणाले.


 
Top