धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इयत्ता 8वी विभागात विद्यार्थी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी मुख्याध्यापक हदी काजी, उपमुख्याध्यापिका कु. मानसी कथले, पर्यवेक्षिका कु. मेघल गोरे, कु. अनुष्का लगदिवे तर विद्यार्थी अध्यापक/ अध्यापिका म्हणून हुग्गे पृथ्वीराज, कदम शौर्य, खंडाळकर कार्तिक, इंदापूरकर कृष्णा, जाधव साहिल, पृथ्वीराज सदगर, संस्कार भोजने, प्राप्ती जाधवर, रेणूका पाटील, भक्ती माने, सिद्धी पाकले, श्रेयसी सरपाळे, अनुष्का शिनगारे जाधव श्रेयायांनी भूमिका पार पाडल्या.  इयत्ता 8 वी अ, सी, डी, ई मधील जवळपास 181 विद्यार्थी उपस्थित होते, इ. 8वी चे पर्यवेक्षक एन . एन. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमासाठी श्रीमती माने, कलाध्यापक एस.डी. भोसले, गणित अध्यापक रामेश्वर बोबडे, अ.आ. जाधव,के.आर. शिंदे, सहशिक्षक शेगर, अंबादास माढे, शरद क्षीरसागर यांनी मोलाचे सहकार्य केले.


 
Top