धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर फायनल झाले असेल तरी महायुतीमध्ये मात्र उस्मानाबादच्या उमेदवारीवरून घटक पक्षात वाटाघाटी चालू आहेत. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटात मात्र धनंजय सावंत यांच्या उमेदवारीवरून शिवसेना प्रवक्ता योगेश केदार यांनी चांगलेच सुनावले आहे. तर याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख दराडे ताई यांनी त्यास जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.  शिवसेनेच्या शिंदे गटात धाराशिव येथील उमेदवारीवरून तु तू मै मै चालू असल्याचे पहावयास मिळत आहे.

योगेश केदार यांनी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर जे पुण्यात लावले होते. त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. हा संदर्भ घेवून योगेश केदार यांनी अगोदर पक्ष वाढवा असे म्हणत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून स्वतःच्या पुतण्यासाठी उमेदवारी मागत आहेत. अशा ने पक्ष कसा वाढेल? असा प्रश्न उपस्थित करून योगेश केदार याने धनंजय सावंत यांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. योगेश केदारला प्रतिउत्तर देताना धाराशिव शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख दराडे ताई यांनी योगेश केदारवर जोरदार टिका केली. तु शिवसेनेत आला कधी? प्रवक्ता झाला कधी? आपल्या इज्जतीत रहा असा इशारा देत तु फक्त गावाचे नाव सांग येथे येवून आम्ही तुला जाब विचारू शकतो असा इशारापण दराडे ताई यांनी दिला आहे. एकंदर धाराशिव लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून शिवसेनेच्या एका गटाचा असंतोष बाहेर पडल्याचे मानले जात आहे.  
Top