भूम (प्रतिनिधी)- संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या समर्थक पसंतीच्या नेत्याला उमेदवारी मिळावी. यासाठी कार्यकर्ते पाठपूरावा करत आहेत. जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या चार-पाच दशकात मोठ मोठे पदे जबाबदारीने सांभाळलेल्या. सर्व पक्षात हितसंबंध असलेल्या महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विधीज्ञ मिलिंद पाटील यांना उमेदवारी द्यावी. यासाठी देखील असंख्य पदाधिकारी आपापल्या नेत्याकडे पाठपुरावा करत देव देवताकडेही साकडे घालताना दिसत आहे. 

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नवीन सरकार अस्तित्वात आले. यामध्ये पक्षीय ताकद पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत.  शिंदे शिवसेना गटाचे फक्त दोन आमदार आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाचा एकही आमदार मतदार संघांमध्ये नाही. यामुळे या जागा वाटपा दरम्यान गल्लीपासून दिल्ली पर्यंतचं वादळ हे फक्त मोदींचे आहे. ही बाब विचारात घेता धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीची या मतदारसंघातील प्रत्येक नेते मंडळी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिंदे सेनेचे नेते मंडळी शिवसेनेला जागा मिळाली यासाठी तर अजित पवार राष्ट्रवादीची  देखील नेते मंडळी राष्ट्रवादीला जागा मिळावी यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.

जुनी ज्येष्ठ मंडळी मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे. विधीज्ञ मिलिंद पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सर्वच राजकीय पक्षांमधील नेते मंडळी बरोबर असलेला व्यक्तिगत संबंध विचारात घेता सर्वच पक्षातील नेते मंडळींची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत नक्कीच मिळणार आहे यात शंका नाही. एकंदरीत धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळाला तर निश्चितपणे या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. पहिल्यांदाच कमळ चिन्हाच्या माध्यमातून लोकसभेत नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. 


 
Top