धाराशिव (प्रतिनिधी)-ट्रॅक मधील रोख रक्कम 1 लाख 50 हजार हे दि. 05 मार्च 2024 रोजी रात्री ढोकी रस्त्यावर रेल्वे फाटकाच्या पुढे अज्ञात तीन व्यक्तीने जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी सिताराम जेरबंडे यांनी दि.06 मार्च 2024 रोजी ढोकी पोलिस  ठाणे येथे दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा नोंद झाला होतो. या प्रकरणात पोलिसांनी कसून शोध घेतला असता फियादीच आरोपी निघाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या ठिकाणी जावून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सिताराम उर्फ सिध्दराम रामचंद जेरबंडे, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड आम्रपाली चौक, सोलापूर यांच्या कडे सखोल चौकशी केली. सदर घटनेबाबत यातील फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणात कसून चौकशी केल्यानंतर जेरबंडे यांने मला लोकांचे उसने पैसे देणे असल्याने मी माझे जवळील मालकाचे पैसे चोरी झाल्याचा बनाव रचून ते पैसे हडपण्याचा बेत आखून माझा मित्र हैदर मुजावर रा. सलगर वस्ती, झोपडपट्टी नं 02 सोलापूर यास बोलावून घेवून सदरचा गुन्हा मी व माझा मित्र यांनी केला असल्याची कबुली दिली. 

सदरची कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक मुजीब पठाण, आरब, अशोक कदम, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top