धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या काही दिवसापासून कळंब तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुडघुस घातला होता. पेट्रोलपंप दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, एटीएम मशीन चोरी आदी प्रकरणामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. कळंब पोलिसांनी चोरट्यांचे आव्हान स्विकारून पेट्रोलपंप दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, एटीएम चोरी यामधील आरोपींचा तपास करून अट्टल 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या आरोपींवर महाराष्ट्रात काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकप्रकारे समाधान व्यक्त केले आहे.

दिनांक 30.08.2023 रोजी कळंब शहरातील एसबीआय बॅकेचे एटीएम घेवून जावून त्यामधील एकुण 33 लाख 16 हजार 500 रूपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. त्यावरुन गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषणच्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यापैकी आरोपी नामे राजपासिंग अजयसिंग बादा, आकाशसिंग गोखे दोघे रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये एटीएमचे पार्ट व इतर साहित्य व रोख  35 हजार रूपये जप्त करण्यात आलेले आहे.

तर दि. 28.1.2024 रोजी कळंब ते येरमाळा जाणारे रोडवर असलेले राजश्री पेट्रोल पंपामध्ये 04 इसमांनी मोटार सायकलवर येवून पंपवारील काम करणाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून काउंटरमधील 3 लाख 28  हजार 808 रूपये चोरुन नेले. सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषणच्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत. विकास सुभाष सावंत, वय 27 वय रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील गेला माला पैकी, रोख 10 हजार 300 रूपये गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे हस्तगत करण्यात आलेले आहेत.

तसेच दि. 02.02.2024 रोजी रात्री 21.00 ते दि. 03.02.2024 रोजी सकाळी 06.00 वा. चे दरम्यान माउली टायर्स दुकान, परळी रोड, भेजराज हॉटेल शेजारी लोंढा ट्रेडर्स दुकानातुन परळी बायपास रोड कळंब, राजमंगल बिल्डींग मटेरिल ॲन्ड हार्डवेअर दुकानातुन परळी रोड, भोजराज हॉटेल शेजारी, कळंब ता. धाराशिव येथे दुकानात प्रवेश करुन दुकानातुन एकुण 1 लाख 60 हजार रूपये रोख रक्कम चोरुन नेली. सदर गुन्हा तपासा दरम्यान गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषणच्या आधारे तसेच पोलीस ठाणे बार्शी ग्रामीण जि. सोलापूर यांचे मदतीने आरोपी करतारसिंग अचलसिंग दुधानी, वय 24 वर्षे रा. शिवाजी चौक, परळी ता. परळी जि. बीड, अक्षय पोपटराव पाडोळे, वय 29 वर्षे रा. जुना महाडा कॉलनी, विमान नगर पुणे जि. पुणे,  हमीद महेबुब शेख रा रामटेक पुणे, जगजीतसिंग आचीलसिंग दुधानी रा. परळी जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून  गुन्ह्यातील गेल्या माला पैकी एकुण 10 हजार 100 रूपये रोख हस्तगत करण्यात आले आहे.

तसेच दि. 16.02.2024 रोजी समर्थ पेट्रोलपंप मस्सा(खं) येथे अज्ञात मोटार सायकल धाराकांनी शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपाचे काउंटर मधील एकुण 70 हजार रूपये चोरुन लेले आहे. तसेच गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत. विकास सुभाष सावंत, वय 27 वर्षे रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड हे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच सदर आरोपीवर महाराष्ट्रात विविध पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाणेचे  पोलीस निरीक्षक रवि सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलीस उप निरीक्षक रामहारी चाटे, पोलीस हावलदार-गणेश वाघमोडे, पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे, शिवाजी राऊत, अजिज शेख पोलीस अमंलदार फत्तेपुरे, दिगंबर अंजान, सुनिल तारळकर, सुरज पाचाळ, सुरज गायकवाड, नवनाथ खांडेकर  यांच्या पथकाने केली आहे. 
Top