धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले जुने शिवसैनिक तथा माजी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे यांची शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांची सोमवारी मुंबई येथे निवड करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील बाळासाहेब भवनात पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्र देऊन खोचरे यांना वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अधिक जोरकसपणे पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, संपर्क नेते अनंत जाधव, आमदार मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सूरज साळूके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवहर स्वामी, राहुल डोके आदींची उपस्थिती होती. 
Top