धाराशिव (प्रतिनिधी)-टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर या ठिकाणी दिनांक 17 ते 19 मार्च 2024 या दरम्यान राष्ट्रीय युथ फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये तब्बल वीस राज्यातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या युथ फेस्टिवल दरम्यान अनेक गावचे सरपंच, ग्रामसेवक देखील या युथ फेस्टिवलला भेट देणार आहे. या सर्व परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक पौराणिक नैसर्गिक पर्यटनाची माहिती व्हावी या उद्देशाने पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने या ठिकाणी धाराशिव जिल्हा मधील पर्यटन स्थळांचे प्रदर्शन दालन लावण्यात आले होते. या दालनाचे उद्घाटन टाटा इन्स्टिट्यूटचे उपसंचालक प्रा. रमेश जारे व पर्यटन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष युवराज नळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवराज नळे यांनी धाराशिव जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांबाबतची माहिती सर्वांना दिली. याप्रसंगी टाटा इन्स्टिट्यूटचे गणेश चादरे, दूर्वा जोशी यांच्यासह पर्यटन जनजागृती संस्थेचे राजाभाऊ कारंडे, विक्रांत नळे, एकनाथ गुरव, वैभव वाघचौरे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सदरच्या पर्यटन दालनाला विविध राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी भेट देत पाहणी करून माहिती घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला.


 
Top