धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. सौ. मंजुषा कोकीळ स्मृती सहाय्य निधी (वर्ष दुसरे) कु. प्रणिता मोहन पवार या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला.

आर्थिक दृष्ट्या गरीब पण होतकरू मुलीला उच्च शिक्षणासाठी मदत म्हणून कोकीळ परिवारातर्फे हा निधी देण्यात येतो. रुपये 25000/- रोख आणि प्रशस्तीपत्र असे या निधीचे स्वरूप आहे.धाराशिव येथील 18 महिला मंडळ, धारासुर मर्दिनी फेडरेशन चे सर्व सदस्य आणि प्रचंड संख्येने आलेल्या  महिलांच्या उपस्थितीमध्ये सौ. मीरा कोकीळ ब्रम्हपुरकर यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला. ह्या निधीसाठी परीक्षक म्हणून डॉ. सौ. अनार साळुंके, डॉ.  सौ. रेखा ढगे, सौ. माधवी भोसरेकर, सौ. संगीता काळे, सौ. प्रिता गांधी, सौ. शुभांगी जहागीरदार, सौ. निता कठारे आणि सौ. उज्वला मसलेकर इत्यादी शहरातील मान्यवर महिलांनी काम केले.


 
Top