उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील तुरोरी येथील बावीस वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नसल्याने माझे जीवन संपवत असल्याची चिट्टी खिशात ठेवून आपले जीवन संपवले. शुक्रवारी दुपारी पंचनामा व शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा दूसरा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कृष्णा सतिश जाधव (वय 22) हा मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय होता. तो मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कायम सोशल मिडियावर ॲक्टीव असायचा. उमरगा शहरासह तुरोरी येथील मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कृष्णा जाधव याने सक्रीय सहभाग नोंदवला होता. कृष्णा सतिश जाधव (वय 22) या तरुणाने गुरूवारी (दि.28) सायंकाळी चूलत्याचा पडक्या घरातील लाकडी सराला नायलनचा दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. 'एक मराठा लाख मराठा' मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नसल्याने माझे जीवन संपवत आहे. कृष्णा जाधव असे निळ्या शाईच्या पेनने लिहिलेली मजुकुराची चिट्टी पँटच्या खिशातून पोलिसांनी जप्त केली. 


 
Top