तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या अतिप्राचीन दागदागिने, मौल्यवान वस्तू प्रकरणी केवळ एकच आरोपी  चिलोजीबुवा जिवंत असुन उर्वरीत नावे असलेले आरोपी मयत आहेत. इतर आरोपींची माहीती संबधितांकडुन मागवली आहे. मुख्य आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चौकशीत सहकार्य न केल्यास नार्कोटेस्ट बाबतीत विचार करायाचा का नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्यातरी तपास योग्य दिशेने चालु असल्याची माहीती तपास अधिकारी तया उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी पञकारांशी बोलताना दिली.

या प्रकरणा बाबतीत बोलताना देशमुख पुढे म्हणाले कि, मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा यांना सेशन कोर्टाने जामिन नाकारला आहे. त्यांच्या शोधासाठी सर्व स्ञोञांचा वापर केला पण ते मिळुन आले नाहीत. यामुळे सीआरपीसी 73 अंतर्गत निरंतर वाँरंट काढण्याचा प्रस्ताव न्यायालयाकडे सादर केला आहे. त्यांनी हायकोर्टात जामिनीसाठी अर्ज केला पण तिथेही आम्ही चांगले म्हणने मांडले आहे. सदर गुन्हयात तपासात महत्त्वाचे साक्षीदार मिळाले आहेत. त्यांचे सविस्तर जवाब नोंदवले असुन 174 प्रमाणे न्यायालयात दाखल केले आहेत. डाँक्युमेंटरी पुरावे मोठ्या प्रमाणात आहेत. संबंधित मंदीर प्रशासनाकडुन घेवुन ते सिरीयल सिक्वेंस प्रमाणे लावण्याचे काम सुरु आहेत. गुन्हा घडलेल्या काळातील इतर बरेच आरोपीची नावे मंदीर समितीकडुन मागविले आहेत असे शेवटी म्हणाले.


 
Top