धाराशिव (प्रतिनिधी)- बेंबळी, येरमाळा, तुळजापूर, धाराशिव ग्रामीण, वाशी, शिराढोण, धाराशिव शहर  पोलीस स्टेशनच्या 13 गुन्ह्यातील मुद्देमाल मुळ मालकास परत करण्यात आला. यामध्ये 506 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, मोटरसायकल  व 41 मोबाईल फोन असा एकुण 31 लाख 10 हजार 80 रूपये किंमतीचा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकास परत करण्यात आला.

.पोलीस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन धराशिव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत जप्त केला जातो. मुळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्या संक्लपनेतुन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सभागृह येथे घेण्यात आला. 

सदर कार्यक्रमास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डोगंरे, काचुळे, पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार तसेच 35 ते 40 मुळ मालक हे उपस्थित होते. मौल्यवान माल परत मिळवून दिल्याबद्दल या प्रसंगी मालमत्ता धारकांने पोलिसांचे आभार व्यक्त केले. 
Top