भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत भगवाण बाबा यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा भगवाण बाबा गडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांच्या हस्ते ब्रम्हवृदांच्या मत्रोच्चाराने मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

सोनगिरी ता. भूम येथे गेल्या वर्षभरापासून नव्याने राष्ट्रसंत भगवाण बाबा यांच्या मंदीराचे निर्माण कार्य सुरु होते. या मंदीराचे बांधकाम पुर्ण झाल्याने प्राणप्रतिष्ठा सोहळा 29 रोजी संपन्न झाला. सकाळी रथातुन महंत नामदेव शास्री यांची मिरवणुक काढत भव्य शोभायात्रा सोनगिरी गावात काढण्यात आली. यानंतर महंत नामदेव शास्री महाराज यांच्या हस्ते मुर्तीची विधीवत पुजा करुन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जि. प. उपाध्यक्ष धनाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे, माजी नगराअध्यक्ष संजय गाढवे, सेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे आदी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत होते. मंदीराचे काम लोकवर्गणीतुन पुर्ण झाले असून यावेळी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सभागृहासाठी 10 लाखाचा निधी जाहीर केला. तर खासदार निधीतून खासदार यांनी 10 लाखाचा निधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी जाहीर केल्याने सोनगिरी ग्रामस्तांनी यावेळी आभार मानले. यानंतर हभप विठ्ठल महाराज शास्री आळंदी यांचे काल्याचे किर्तन होवुन महाआरती नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या पाच दिवसापासून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने तालुक्यातील व सोनगिरी परिसरातील भाविकांची गर्दी दिसुन आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोनगिरी ग्रामस्तांनी परिश्रम घेतले.


 
Top