धाराशिव (प्रतिनिधी)-न्यायिक क्षेत्रात चुका आणि शिका त्याचबरोबर नवीन वकिलांच्या कायदेविषयक ज्ञानवृध्दीसाठी नवनवीन संशोधने आवश्यक आहेत. विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय अंबेकर यांनी आपल्या संशोधनातून लिहिलेले ‌‘लिगल रिसर्च मेथडॉलॉजी' पुस्तक विधी विद्यार्थी आणि नूतन वकिलांसाठी वरदान ठरेल, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रशांत दिक्षीत यांनी व्यक्त केले.

जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या सभागृहात गुरूवारी येथील बापूजी साळुंके विधी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. संजय अंबेकर लिखित लिगल रिसर्च मेथडॉलॉजी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश बी. यू. चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र कदम, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रामचंद्र गरड, डॉ. सहदेव रसाळ, डॉ. पंकज शिनगारे, राजेंद्र अत्रे, ॲड. नितीन भोसले, डॉ. शिवाजीराव गायकवाड, प्रा. माधव उगीले, स्वाती देशमुख, लेखक प्रा. डॉ. संजय अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लेखक प्रा. डॉ. आंबेकर यांनी, पुस्तक लिहिण्यासाठी मिळालेली प्रेरणा, उद्देश तसेच पुस्तकाची उपयोगिता याबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती यांनी उपस्थितांना पुस्तकाची उपयोगिता आणि महत्व पटवून दिले. यावेळी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. कदम, ॲड. गरड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ृती जाधव तर आभार ज्ञानेश्वरी जाधवर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास ॲड. एस. डी. बाबरे, ॲड. राहुल जाधव, विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top