धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही एस टी एफ, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट व मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च 2024 रोजी मल्टी स्किल प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी आमदार सुजितसिंह ठाकू , आमदार राणाजगजितसिंह पाटील, मित्राचे सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रवीणसिंह परदेशी यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व सांगून युवकांना स्वतःचे कौशल्य विकसित करून औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करावे व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी  महत्त्वाची भूमिका निभावून स्वतःचे व आपल्या संपर्कातील युवकांचे कौशल्य विकसित करण्याबद्दल आवाहन केले.

 यावेळी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले की, युवकांसाठी सरकारकडून विविध शासकीय योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये युवकांनी वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्वल करावे. यावेळी युवकांसाठी असलेल्या शासकीय विविध योजना विषयी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्हीएसटीएफचे अधिकारी  दिलीपसिंग बायस, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने तसेच तेरणा कॉलेजचे सर्व प्राध्यापक तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे क्लस्टर प्रमुख सदाशिव साबळे, केंद्रप्रमुख बालाजी भालेराव, संतोष गुंजोटे, अतुल मोरे  उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज चे कर्मचारी व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.


 
Top