धाराशिव (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिराचे पुजारी यांना ऑनलाईन डिजिटल माध्यम व सोशल मीडिया वापराबाबत सल्ला मार्गदर्शन शिबिर कार्यशाळाचे दिनांक 06 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री तुळजाभवानी अभियांत्रिक महाविद्यालय,तुळजापुर येथे घेण्यात आले यावेळी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे,सायबर पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी,अनिल भोसले सायबर,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सोमनाथ वाडकर,लेखापाल तथा सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक सिद्धेश्वर इतुले,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे,सुयोग अमृतराव,धनंजय लोंढे,नागेश साळुंखे,प्रवीण अमृतराव आदींसह पुजारी बांधव उपस्थित होते.


 
Top