तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मंदिरात  रविवारी दि. 24 मार्च  रोजी होळी उत्सव. तर सोमवारी दि. 25 मार्च रोजी धुलिवंदन व शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी रंगपंचमी उत्सव साजरा केला जाणार आहे.

रविवार दि. 24 मार्च रोजी  हुताशनी पोर्णिमा दिनी  फाल्गुन शके 1945 रोजी सांयकाळी होमकुंडा समोर होळी प्रज्वलन करुन होळी उत्सव  साजरा केला आहे. नंतर जोगवा विधी संपन्न होणार आहे. सोमवार दि. 25 मार्च रोजी धुलिवंदन उत्सव आहे. रात्रौ छबिना काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार दि. 30 मार्च रोजी रंगपंचमी उत्सव साजरा केला जाणार आहे.


 
Top