तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस  तापमान वाढत असल्याने  तृष्णा भागविणारे माठातील पाणी पिण्यासाठी वाढत्या उन्हा बरोबर माठांच्या मागणीतही वाढ होत आहे. तहान भागविणारे  थंड  पाण्यासाठी सामान्य माणसांना माठाच्या पाण्याचीच भुरळ पड. सध्या आठवडा बाजार सह शहरात विविधसा ठिकाणी माठ विक्री होताना पाहायला मिळत आहे.

उन्हाळ्यात डॉक्टरांचा सल्ला असतो की, पाणी भरपूर प्या. त्यासाठी आपण फ्रीजमधील थंड पाण्याची बाटली तोंडाला लावतो. मात्र फ्रीजमधील अतिथंड असल्याने व तहान भागविणारे नसल्याने व या  पाण्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.अशा मानसिकतेमुळे सध्या श्रीमंतापासुन गरीबांपर्यत माठ्यातील पाण्याने आपली तहान सध्या भागविण्याकडे कल वाढला आहे.थंड पाणी पिल्याने सर्दी,घसा खवखवणे, घश्याला सूज येणे असा त्रास होऊ शकतो. माठ म्हणजे गरिबांचे फ्रीज असे म्हटले जाते. तापमानाचा पारा वाढत आहे. तसतसे माठ विक्रीही वाढत आहे. घरी फ्रिज असणारेही माठाची खरेदी

करताना बगायला मिळत आहे. सर्व वर्गातील नागरिक खरेदी करताना दिसून येत आहेत.

माठाची निर्मिती कशी होते. माठाची निर्मिती पारंपरिक पद्धतीने बाजारातील माठांचे प्रकार, बाजरात विविध प्रकारचे माठ आले आहेत. काळा माठ, नक्षत्री माठ, लाल माठ असे प्रकार पाहायला मिळतील. काळा माठाची निर्मिती खेड्यातील कुभारांकडे तुळजापूर खुर्द, काक्रंबा, भंडारकवठा यासह अनेक खेड्या

गावातून होते. लाल माठ मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून येतो. तीनही माठांची मागणी उन्हाळ्यात भरपूर असते. शेतातील काळी माती आणुन  माती फिरत्या चाकावर घेवून तिला आकार देऊन माठ तयार केला जातो. 

काळ्या माठाला अधिक मागणी 

नागरिकांनी सजावटीकडे व नक्षींकडे न पाहता काळया रंगाचे माठ घ्यावे, जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. माती नैसर्गिकरित्या चांगली असल्याने यामध्ये पाणी जास्त गार होते. लाल माठा पेक्षा काळा माठ टिकाऊ आणि मजबूत असतो. कापड ओलं करून माठाच्या चारही बाजूंनी गुंडाळून ठेवलं तर खूप छान. उन्हाळ्यात माठा मधले पाणी खूपच चांगले असते. गर्मीमुळे गार पाणी पिऊ वाटते. फ्रीजमधले पाणी पिल्याने सर्दी खोकला असा त्रास होतो. माठातल्या पाण्याने सर्दी त्रास कधीच होणार नाही. 

उन्हाळ्यात माठाची विक्री खूप होते.

माठातील पाण्यामध्ये थंडावा, उत्तम चव आणि अनेक पोषक तत्त्वदेखील आधी ऑफिसमध्ये माठ असायचे, उन्हाळ्यात पाणीपोई असायच्या. सध्या चौकात अशा गोष्टी कुठेही बघायला मिळणार नाहीत. कोणत्याही ऑफिस मिनरल वॉटर जार पाणी बॉटल बॉक्स दिसतो. यामुळे कुंभार व्यवसायावर थोडा परिणाम झाला आहे. माठाचा आरोग्यावर फायदा फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने यशात खाज, सर्दी, घसा खवखवणे, घशाला सूज येणे असा त्रास होऊ शकतो. पण मातीच्या माठातील पाण्याचे तापमान यशात हलके असते आणि त्यामुळे तीव्र सर्दी, खोकला वाढत नाही. उन्हाळ्यात माठातील थंडगार पाण्याची चव अगदी मधासारखी असतात. 

सध्याचा माठाचा भाव

काळा माठ 150 ते 400 पर्यंत त्याच्या आकारानुसार किंमत ठरते. नक्षत्री माठ थोडा जाड असतो. याचा दर 300 ते 600 पर्यंत त्याच्या आकारावरून ठरतो. लाल माठ हा थोडा पातळ असतो.


 
Top