तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषद मुख्याधिकारीपदी आयएएस प्रियंवदा म्हाडदाळकर (भा.प्र.से.) विराजमान होताच यांनी धडाकेबाज कामगिरी करीत असुन त्या येण्यापुर्वी वसुली अत्यल्प होती. माञ त्यांनी वसुलीत लक्ष घालुन दुप्पट वसुली पंधरा दिवसात करुन शंभर टक्के वसुलीसाठी त्या प्रयत्नशिल आहेत. त्यांनी थकबाकी दाराचे पंचवीस पेक्षा अधिक नळ कनेक्शन तोडले आहेत. दोन थकबाकीदार दुकाने सिल करण्यात आली. तसेच सर्व थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहेत. त्यांनी वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांना नागरीकांचा चांगला प्रतिसाद आहे.

दिनांक 4 मार्च रोजी वसुली मुख्याधिकारी म्हणून पद्भार स्विकारल्या नंतर त्यांनी प्रथमतः वसुली विभागाच्या कामाचा आढावा घेतला. वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ते वाढवण्यासाठी उद्यापासून जलद गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मुख्याधिकारी स्वतः प्रत्येक थकबाकीदारांना भेटून वसुलीची रक्कम तत्काळ भरण्याबाबत शेवटची संधी दिली होती.  ज्यांचेकडे थकीत रक्कमा आहेत त्यांचे तात्काळ नळ कनेक्शन कट करण्याबाबत पाणीपुरवठा विभाग यांना सक्त निर्देश दिले होते. जे कर्मचारी वसुली कामांमध्ये हायगय अथवा निष्काळजीपणा करतील त्यांचे चालू महिन्याचे वेतन रोखण्यात येईल अशा सूचना त्यांनी वेळोवेळी दिल्या. शिवाय नगरपरिषद  कामचुकार कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल अशी तंबीच त्यांनी बैठकीत दिल्या होत्या. त्यामुळे सर्व कर्मचारी या कामांमध्ये पुढाकार घेऊन, वसुलीचे उद्दिष्ट आगामी 15 दिवसात पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करण्यास सुरुवात केली होती.  यासाठी शहरातील थकबाकीदार यांनी तात्काळ रक्कम भरून घेऊन जबाबदार नागरिक होण्याचे दायीत्व पूर्ण करावे असे आवाहन थकबाकीदार यांना केले होते. मुख्याधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या 20 दिवसात 32 टक्के असलेली वसुलीचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. 


 
Top