उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवकन्या शिंदे यांची गुरुवारी (दि 14) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसरपंचपदी अमोल अंबुलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तालुक्यातील मुळज ग्रामपंचायती च्या सरपंच सुनिता वडदरे यांनी मागील महिन्यात मुदतपूर्व राजीनामा दिला होता. तर दोन महिन्या पूर्वी उपसरपंच प्रविण पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे दोन्ही पदे रिक्त झाली होती. रिक्त पदाच्या निवडी संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी, (दि 14) सकाळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायती 15 सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. बैठकिला 13 सदस्य हजर होते. तर एक पुरुष व महिला असे दोन सदस्य गैरहजर होते. सरपंच पदासाठी शिवकन्या महेश शिंदे तर उपसरपंच पदासाठी अमोल अरुणअंबुलगे या दोघांनी प्रत्येकी एकच अर्ज दाखल केले. प्रत्येकी एकच अर्ज आल्यामूळे दुपारी अडीच्या सुमारास अध्यासी अधिकारी राठोड यांनी दोन्ही निवडी बिनविरोध घोषीत केल्या. त्यांना याकामी ग्रामसेवक एस एम बिद्री यांनी सहकार्य केले. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचीत व माजी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य श्रीमंत चव्हाण, मोहित चालुक्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे व्हाइस चेअरमन सतिश जाधव, अजिंक्य पाटील, आप्पाराव वडदरे, बाबु दुधभाते, राजश्री माळी, संध्या घोटने, ज्ञानेश्वर घोटने, महेश शिंदे, गोपाळ शिंदे, दिपक चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी रमेश सुर्यवंशी, कृष्णा गवळी आदीसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top