तुळजापूर (प्रतिनिधी) -येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले  पोलिस हवालदार गुरुनाथ लोखंडे यांची कन्या  गिरीजादेवी गुरुनाथ लोखंडे हिने राज्यसेवा वर्ग 1 परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होवुन ती तहसिलदार बनली  आहे. धाराशिव जिल्हयातील महाळंगी सारख्या या ग्रामीण भागातील मुलीने मिळवलेले यश आर्दशवत आहे.

 गिरीजादेवी हिचे प्राथमिक श्री श्री रविशंकर विद्यालय व  पदवी शिक्षण धाराशिव येथेच  झाले आहे. नंतर एलएलबी धाराशिव येथे झाले आहे. कुठल्याही स्पर्धा परिक्षेच्या क्लासेसला  न जाता तिने हे घवघवीत यश संपादन केल्याने तिचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे. हे यश  धाराशिव जिल्हयातील ग्रामीण विध्यार्थांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. स्पर्धा परिक्षासाठी  शहरी भागात जावुन लाखो रुपये खर्चु करुन यश मिळवतात. माञ गिरीजादेवी हिने धाराशिव येथेच शिक्षण घेवुन क्लासेससाठी  बाहेर न जाता ही स्पर्धा परिक्षा यशस्वी होता येते ही तिने सिध्द करुन दाखवुन दिले आहे. सध्या गिरीजादेवी ही कामगार कल्याण अधिकारी वर्ग दोन पदावर कार्यरत आहे. या तिच्या यशात आई, वडील, शिक्षक यांचा मोठा वाटा आहे.


 
Top