भूम (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असुन जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी विधानसभा मतदार संघाकडे सर्वाच राजकिय पक्षाचे लक्ष लागले आहे. मंत्री तानाजी सावंत गटाच्या परांडा तालुका महिला आघाडीच्या परांडा तालुका प्रमूख ताई लांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला असुन तानाजी सावंत यांच्या गटाला मोठे भगदाड पडले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भूम येथील शासकिय वािमगृह या ठिकाणी ताई लांडे यांच्या सह पाचशे महिलांनी प्रवेश केला आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, संपर्क प्रमूख सुनिल काटमोरे, लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर, आमदार कैलास पाटील, सहसपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, मकरंदराजे निंबाळकर, युवासेना संपर्क प्रमुख किरण लोहार  माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख संजय नटे, महिला आघाडी जिल्हा प्रमूख जिनत सय्यद, युवसेना विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे, उपजिला प्रमूख महिला आघाडी कल्याणी बोराडे, तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, परांडा तालुका प्रमूख मेघराज पाटील, महिला तालुका प्रमूख उमाताई रणदिवे, गपाट छाया जोगदंड, कांचन देवकर, उषा जगताप, रेखा मागळे, सोनाली साखरे, रेश्मा मेटे, उर्मिला झांबरे, रेखा कपाट  यांच्या सह महिला मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करताना उपस्थित होत्या.


 
Top