धाराशिव (प्रतिनिधी)-11 मोटारसायकल चोरनारा अट्टल चोर पार्डी फाटा येथे चोरलेल्या मोटार सायकल विकण्यासाठी थांबला असल्याची माहिती विशेष पोलिस पथकास मिळताच पथकाने अट्टल चोरास मोटारसायकलसह अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे सुचनेनुसार विशेष पोलिस पथक मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात असताना दि. 09 मार्च 2024 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राम माधव भोसले रा. खानापुर ता. वाशी ह.मु. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर याने धाराशिव जिल्हृयातील व परजिल्ह्यातील बऱ्याच मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. तो सध्या पार्डी फाटा, येथे एक चोरीची मोटार सायकल घेवून थांबलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने पथक बातमीच्या ठिकाणी रवाना होवून बातमी मधील इसमास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यात असलेली मोटार सायकल जप्त करुन त्याची खात्री करता ती पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरंन 96/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. 

त्याच्याकडे आणखीन सखोल चौकशी केली. त्याने दारुच्या नशेत धाराशिव शहर, येरमाळा, मुरुम, भुम येथुन मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. तसेच मुरुड जि. लातुर येथे एक घरफोडी करुन तेथुन पण एक मोटार सायकल चोरी करुन आणलेली आहे. सदर चोरी केलेल्या मोटारसायकली  या त्याने त्याच्या  राहात्या घरी पांगरी येथे लपवून ठेवल्या आहेत असे सांगितले.  पथकाने आरोपीच्या रहात्या घरी जावून छापा मरला असता सदर ठिकाणी आरोपीच्या ताब्यातुन एकुण 10 चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या मोटार सायकल जप्त करुन सदर पथक हे धाराशिवकडे येत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सौरभ चंद्रकांत शिंगाडे रा. बौध्द नगर, धाराशिव यांच्या कडून पोस्टे धाराशिव शहर गुरनं 112/2023 कलम 379 भा.दं.वि.सं. गुन्ह्यातील एक होन्डा ॲक्टीवा ही मोटर सायकल जप्त केली आहे. अशा एकुण 11 चोरीच्या मोटार सायकली जप्त केल्या आहेत. 

आरोपी विरूध्द लातूर व धाराशिव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.


यांनी केली कामगिरी

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार  विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढागारे, पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, चालक पोहेकॉ अरब, लाटे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top