धाराशिव (प्रतिनिधी) -सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे 29 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत पार पडलेल्या महासंस्कृती महोत्सव 2024 च्या यशस्वी आयोजनाबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

पाच दिवस जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांसह सिनेकलाकारांच्या विविध कलाविष्काराचे धाराशिवकरांना दर्शन झाले. स्थानिक कलाकारांनी लोकगीते, कोळीगीते, साहित्यीकांनी कवी संमेलन व सांस्कृतिक कलाकारांनी आपल्या नृत्य कलेच्या माध्यमातून धाराशिवकरांची वाहवा मिळविली. रसिकांकडून कलाकारांचे तोंड भरून कौतुक झाले. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि उपजिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे, धाराशिव नाट्य परिषदेचे सल्लागार डॉ. अभय शहापूरकर, कवी राजेंद्र अत्रे, सतीश ओव्हाळ, शशी माने, सुगत सोनवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरयेथील प्रा. डॉ. उषा कांबळे आदी उपस्थित होते.


 
Top