धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकार सत्तेत आल्यापासून धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतुद होत असून राजमाता जिजाऊ चौक, धाराशिव ते बोरफळ रस्ता, तुळजापूर ते नळदुर्ग रस्ता व धाराशिव शहरातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या रु.539 कोटी किंमतीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. सातत्यपूर्ण  पाठपुराव्यामुळे या रस्यांत्याच्या कामांना मंजूरी मिळाली असून यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

मागील पाच वर्षात धाराशिव शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्यातच भुयारी गटार योजनेचे काम नियोजनबद्ध पद्धतीने न केल्याने शहरवासियांना खड्डे आणि धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून जवळपास 25 किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांसाठी 117 कोटी 60 लक्ष किंमतीच्या 59 सिमेंट रस्ते व नाली बांधकामाची निविदा प्रक्रिया  सुरू करण्यात आली आहे.

तुळजापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शहराला जोडणारे सर्व रस्ते दर्जदार असावेत यावर विशेष लक्ष देण्यात येत असून तुळजापूर-नळदुर्ग रस्यार्च्या सुधारणेकरिता रु.136.34 कोटी किंमतीच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तुळजापूर शहरातील रस्याणेचे दुभाजकासह चौपदरीकरण करण्यात येणार असून उर्वरीत लांबीत 10 मीटरचा रस्ता असणार आहे. तुळजापूरला जोडणाऱ्या केवळ बार्शी-तुळजापूर याच रस्याहेचे काम आता बाकी असून या रस्यांटीसाठी देखील निधी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

धाराशिवकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या राजमाता जिजाऊ चौक, धाराशिव ते बोरफळ रस्त्याला हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत मंजूरी मिळाली असून या कामाची रु.285 कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. सदरील कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी यापुढेही आपला पाठपुरावा सुरू राहील. तसेच नागरिकांनी देखील कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


 
Top