धाराशिव (प्रतिनिधी)-पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करून न दिल्याने समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. अरवत यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि दिनेश उत्तमराव जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

25 मार्च रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल असल्याने गुन्ह्याचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनाम्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करून देण्याची पोलिसांनी मागणी केली होती. कर्मचारी पुरविण्याबाबत तरतूद नसल्याचे पत्र देवून शासकीय पंच पुरविले नाही. शासनाचे आदेश असताना सुध्दा अरवत यांनी शासकीय पंच पुरविले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करत उल्लघंन केल्याने धाराशिव शहर पोलिस ठाण्यात 188,187 भा. द. वि. सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top