धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग धाराशिवच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामजिक न्याय विभाग महारष्ट्र राज्य व सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी निषेध आंदोलन करण्यात आले.  

मुंबई येथील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उपस्थित व प्रसार माध्यमांसमोर निळा दुपट्टा खाली फेकून दिल्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण भारतातील भीम अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यास जर दिरंगाई झाली तर संपूर्ण धाराशिव जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा धाराशिव यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन शहर पोलीस स्टेशन धाराशिव यांना देण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांनी निळा दुपट्टा फेकून भारतातील भिम अनुयायी यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, यांच्यासोबत सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, सामजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सा.न्याय वाशी तालुकाध्यक्ष उद्धव क्षीरसागर, सामाजिक न्याय महीला पदाधिकारी वनिता शिंदे, सुरेखा कांबळे सामजिक न्याय जिल्हा सरचिणीस राजाभाऊ जानराव,आदिवासीं सेल जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे,आदिवासीं सेल वाशी तालुकाध्यक्ष विशाल काळे, आदिवासीं सेल जिल्हा संघटक संतोष काळे, सामाजिक न्याय तालुका उपाध्यक्ष नितीन रसाळ,  तालुका संघटक अंगुल मानेअंबेजावळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जिप गट प्रमुख लिंबराज लोखंडे, गणेश पोळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.


 
Top