धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्ते तयार करणे, उद्यानाचे सुशोभीकरण करणे, नवीन नाल्यांची निर्मिती करणे, धार्मिक स्थळे असणाऱ्या देवस्थानाच्या सभामंडपाची कामे, इत्यादी विविध विकास कामांचे भमिपूजन करण्यात आले. धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 19 यामध्ये सहारा कॉलनी, बिलाल नगर, भवानी नगर, साई नगर, दत्त नगर, प्रेरणा नगर, मिलिंद नगर,बँक कॉलनी, साठे नगर, पापणाश नगर, आंबेडकर नगर, माणिक चौक, जुनी गल्ली, नेहरू चौक, गणेश नगर, शिवाजी नगर - सांजा रोड, भानू नगर, रण सम्राट चौक, सांजा वेस गल्ली, तांबरी विभाग या सर्व भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना नितीन काळे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असून जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या माध्यमातून 'धाराशिव बदलतय' हे पाहून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. परंतु काही विघ्न संतोषी लोकांना हे पाहवत नाही, पण धाराशिव जिल्ह्यातील सुज्ञ जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. श्रीराम चंद्राचा अवमान करणाऱ्या  विकृत मानसिकतेच्या लोकांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.  जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे असे आश्वासन यावेळी भारतीय जनता जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी दिले.

यावेळी  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज बप्पा नळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाठक, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, शहराध्यक्ष अभय इंगळे, सुनील तात्या काकडे, राहुल काकडे, दाजी आप्पा पवार, संदीप इंगळे, संदीप कोकाटे, दत्ता पेठे, बापू पवार, अरुण पेठे,गणेश मोरे, प्रकाश दिवाने, सागर भोसले, पांडुरंग शिंदे, सकलीन शेख, उपेंद्र थिटे, शरद देगावकर, कुणाल गांधी, वसीम पठाण, केदार मोरे, प्रमोद पडवळ, बाळासाहेब मुंदडा, अवस्थी सर रोहित देशमुख, गणेश इंगळगी, किशोर पवार, बप्पा उंबरे ,अमोल राजे निंबाळकर, प्रवीण सिरसाटे, प्रसाद मुंढे, प्रेम पवार, रमण जाधव, वैभव हंचाटे, धनराज नवले, अक्षय विंचुरे, सागर दंडनाईक, इत्यादी सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top