तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थी ,विद्यार्थीनीना स्टील बाटलीचे वाटत करण्यात आले.              

विविध उपक्रमांतर्गत हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रदूषण टाळणे ही बाब विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमामधून जमा झालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवाडी यांच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थीनीना स्टील बाटलीचे वाटत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापीका अर्चना पाटील , सहशिक्षिका  शांता सलगर हे उपस्थित होते.


 
Top