परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे यांनी पक्षाच्या विविध मोर्चे, आघाड्या व प्रकोष्टच्या अध्यक्ष व संयोजक यांची नावे जाहीर केली असून युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी अरविंद रगडे (वाकडी) व महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पदी सौ. नुतन विलास खोसरे (सोनारी) यांची निवड केली आहे.

 भाजपचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे यांनी नियुक्त केलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे - युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे (वाकडी), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नुतन विलास खोसरे (सोनारी), पंचायतराज व ग्रामविकास तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील (कार्ला), किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे (कौडगाव), ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे (अंदोरा), अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास लोकरे (पिंपळवाडी), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष युसुफ पठाण (आरणगाव), वैद्यकीय आघाडी तालुका संयोजक डॉ.आनंद मोरे (परंडा), विधी आघाडी तालुका संयोजक ॲड. रामभाऊ जामदारे (लोणारवाडी), माजी सैनिक आघाडी तालुका संयोजक मेजर संतोष सुर्यवंशी (डोण्जा), आध्यात्मिक आघाडी तालुका संयोजक ह.भ.प. हनुमंत कोरे (तांदुळवाडी), दिव्यांग आघाडी तालुका संयोजक महादेव बारस्कर (अंदोरी), भटके विमुक्त आघाडी तालुका संयोजक लक्ष्मण जाधव (उंडेगाव), व्यापारी आघाडी तालुका संयोजक रणजित मिस्कीन (डोमगाव), उद्योग आघाडी तालुका संयोजक राम दशरथ झोरे (वाटेफळ), मच्छीमार आघाडी तालुका संयोजक महावीर भोई (आलेश्वर), जैन प्रकोष्ट तालुका संयोजक जयघोष जैन व सोशल मीडिया तालुका संयोजक सिध्दीक हन्नुरे (परंडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा चिटणीस राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, सुजित परदेशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी तसेच भाजपा तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड व तानाजी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top