परंडा (प्रतिनिधी) - देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाने महिलांनी विविध उद्योगधंदे उभारावेत व स्वतःचा उदरनिर्वाह करावा या अनुषंगाने अनेक बचत गटाच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला आहे.अनेक महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.असे मत डॉ शहाजी चंदनशिवे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांनी नगरपरिषद परंडा यांनी  दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रम ईडीपी प्रशिक्षण नगरपरिषद येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना केले.ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे शहर समन्वयक महेश एकसिंगे सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण शिंदे अभियंता आवास योजनेचे बालाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रांतीज्योती शहर स्तरीय संघाच्या अर्चना माने रेशमा तंटक अनिता शिंदे सुनीता सोनवणे सुवर्णा बनसोडे रेणुका साळुंखे अमृता बोर्डे यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक किरण शिंदे यांनी केले पुढे बोलताना डॉ शहाजी चंदनशिवे म्हणाले की उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना नेतृत्व करण्यास मिळते स्वतःचा उद्योग प्रामाणिकपणे केल्यास शून्यातून जग निर्माण करता येते शून्यातून जग निर्माण करणारे अनेक उद्योजक आहेत त्यांचे अनुकरण केले पाहिजे त्यासाठी महिलांची मानसिक स्थिती सकारात्मक पाहिजे. शेवटी कार्यक्रमाचे आभार किरण शिंदे यांनी मानले. यावेळी अनेक उद्योगा विषयी चर्चा करण्यात आली.


 
Top