धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष सुधीर पाटील व संस्था सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील माजी विदयार्थी  डॉ. संदीप शिलवंत सध्या पशुधन अधिकारी वर्ग 1 म्हणून  कार्यरत आहेत. तर डॉ . रजनीश गाडे   व डॉ. नौमन शेख हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि डॉ . स्नेहा जगदाळे सध्या या पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आदित्य गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता व ॲड. रत्नदीप सोनवणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण या प्रशालेमुळे या पदापर्यंत पोहचलो , याचे सारे श्रेय आम्हाला शिकवित असलेल्या गुरुजनांचे व संस्थेच्या सुयोग्य प्रशासनाच्या नियोजनामुळे प्राप्त झाले , या बद्दल खास करून संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांचे त्यांनी विशेष आभार मानले .यावेळी उप मुख्याध्यापक एस.बी. कोळी, पर्यवेक्षक एन. एन. गोरे, श्रीमती बी.बी. गुंड, ज्येष्ठ शिक्षक एन.एल.गोरसे, व्ही. बी. इंगळे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले.


 
Top