तेर (प्रतिनिधी)- येडशी शाखेतील प्रधान तंत्रज्ञ  विश्वंभर  परीट यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसबे तडवळे येथील उपकेंद्रात उत्साहाने करण्यात आला.             

यावेळी तेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अमर स्वामी, येडशी शाखेचे सहाय्यक अभियंता  चव्हाण, उपळा शाखेचे कनिष्ठ अभियंता शुभम मारवडकर, आस्थापना लिपिक शरद शिंदे व मोठ्या संख्येने सर्व कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागाचे अभियंता अमर स्वामी होते. प्रमुख पाहुणे उपळा शाखेचे कनिष्ठ अभियंता शुभम मारवाडकर होते. आभार  जाधव यांनी मानले.यावेळी बापू जगदे, शहाजी पवार, विष्णू इंगळे  व चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.


 
Top