भूम (प्रतिनिधी)-प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवविवाहित तरुणीचा जाळून खून झाल्याची घटना भूम तालुक्यातील ईराचीवाडी येथे शनिवारी घडली. याप्रकरणी तरणीच्या वडिलांनी सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून भूम पोलीस ठाण्यात पती, प्रेयसी व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यापैकी पती व प्रियसी फरार झाले आहेत. तर आरोपी सासू मनिषा तोडकर यांना अटक करून दि. 5 मार्च रोजी कोर्टात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील तक्रारदार मनोहर वसंत पासलकर यांची मुलगी पौर्णिमा ही जानेवारी महिन्यात घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात 5 जानेवारीला मिसिंगची तक्रार नोंद करण्यात आली होती. दरम्यान यानंतर 12 जानेवारीला तिला कोथरूड पोलिसांनी शोधल्यानंतर तिने आपण संमतीने सुरज लहू तोडकर राहणार ईराचीवाडी याच्याशी संमतीने प्रेमविवाह केल्याचे सांगितले. ती पुण्याहुन ईराचीवाडीला निघुन गेली.

या दरम्यानच्या च्या काळात एकदा सासु सुना पुण्यातील घरी येऊन गेल्या होत्या. तिथून परतल्यावर तीन मार्चला  यांनी फोनवरून पासलकर यांना पूर्णिमा हिचा जळाल्याने मृत्यू झाल्याची घटना सांगितली. तातडीने 4 मार्च च्या पहाटे इट येथील शासकीय रुग्णालयात हजर होऊन मुलीची ओळख पटवली. दरम्यान तिचा मृत्यू जाळण्यापूर्वी पोटात  टोकदार वस्तू घालून मारहाण झाल्याचे कळाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता मयत पौर्णिमा हिचा पती सुरज याचे गावातील एका मुलीची प्रेम संबंध होते. त्या प्रेमात पौर्णिमा अडथळा ठरत असल्याने पती सुरज त्याची प्रेयसी व सासू मनीषा तोडकर यांनी टोकदार वस्तूने पोटात मारून खून केला व पुरावा नष्ट करण्याचा हेतूने प्रेत जाळून टाकले. अशी तक्रार पौर्णिमाचे वडील मनोहर पासलकर यांनी भूम पोलीस स्टेशनला दिल्याने याप्रकरणी भूम पोलीस स्टेशनला कलम 302, 201 व 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास साह्य पोलीस निरीक्षक शशिकांत तवार हे करीत आहे.


 
Top