धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते. आणि या अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अविनाश कामतकर व शाखा व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. तीन लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जाते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असून, शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2023-24 या वर्षात नियमित कर्ज फेडकरणाऱ्या 1 लाख 96 जार 696 शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 43 कोटी 41 लाख 2 हजार 614 रूपयांचा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र ग्रामीण बँक या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना व्याज मिळवून देण्यात राज्यात अव्वल ठरली आहे.

तसेच या अगोदर बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून मिळणारे 1 टक्का व्याज सवलती पोटी 3 लाख 53 हजार 317 शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 कोटभ 44 लाख 29 हजार 18 रूपये जमा केले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या 31 मार्चवर केंद्र शासनाकडून मिळणारे 3 टक्के व्याज सवलत रक्कम 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने व्याज सवलत म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 कोटी रूपयाचा लाभ देत 0 टक्के व्याज दराने पीककर्ज मिळत आहे.


 
Top