धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव (सि.) येथे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी महाशिवारात्री निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतीक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 6 ते रविवार 10 मार्च दरम्यान हा महाशिवरात्र महोत्सव साजरा होणार आहे.

यामध्ये बुधवार 6 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भक्तीनाद भजन संध्या उजनी,  तर रात्री 9 ते 11 या दरम्यान ह.भ.प. अक्षय महाराज शेळके (सत्संग आश्रम, चिंचगाव टेकडी) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होईल. गुरुवार, 7 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8  दिपश्री संगीत अकॅडमी सारोळा यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम. रात्री 9 ते 11 ह.भ.प. ज्ञानेश्वर पुरी महाराज (ता. परळी, जि. बीड) यांचे किर्तन तर रात्री 12 ते 2 या वेळेत संगीत भजनाचा कार्यक्रम होईल.

महाशिवरात्री दिवशी म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता श्री. सिध्देश्वराच्या पालखीचे गावात सभामंडपामध्ये आगमन, सकाळी 8 ते 10 शिवलिलामृत (शिवरात्री महात्म्य) ग्रंथ वाचन. 11 ते 5 भारूडाचा भरगच्च कार्यक्रम. सायंकाळी 7 ते 10 श्री. सिध्देश्वर महाराजांच्या पालखीची गावात सवाद्य मिरवणुक होऊन सिध्देश्वर मंदिराकडे प्रस्थान होईल. त्यानंतर रात्री 12:15 वाजता शोभेची दारू व नंतर श्री. सिध्देश्वर मंदिरामध्ये जागर होईल. वरील सर्व कार्यक्रम हे गावातील सभामंडपात होतील.

शनिवार, 9 मार्च रोजी दुपारी 2 ते 6 वेळेत श्री. सिध्देश्वर मंदिरासमोरील मैदानात कुस्त्यांचे जंगी कार्यक्रम तर रात्री 9 ते 12 या वेळेत आर्वेस्ट्रा : नार नखरेवाली हा कार्यक्रम होणार आहे. रविवार, 10 मार्च रोजी ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे  (शिव चरित्रकार, परंडेकर) यांचा किर्तन कार्यक्रम श्री. सिध्देवर मंदिरात होईल. वरील आयोजित सर्व कार्यक्रमास वडगाव सि. व परिसरातील भाविक - भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वडगाव सि. येथील समस्त ग्रामस्थ व श्री. सिध्देश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top