धाराशिव (प्रतिनिधी)-पश्चिम बंगाल राज्यातील संदेशखली येथे घडलेली महिला अत्याचाराची घटना ही अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे. ममता दीदींच्या नाकाखाली, त्यांच्याच पक्षातील शाहजहान शेख महिलांवर अत्याचार करत राहिला आणि ममता दीदी मूग गिळून गप्प बसल्या. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत..!

शेख विरोधात 100 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अखेर पोलिसांनी शेखला अटक केली पण ममता दीदी व त्यांचे सरकार शाहजहानला 55 दिवस का शोधू शकल्या नाहीत हा प्रश्न अजूनही कायम आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या महिला यांनी देखील या विषयी संवेदनशिल असणे अपेक्षीत होते. परंतु केवळ पक्ष बांधीलकी जपण्यात व्यस्त असलेल्या महिला नेत्या या गंभीर विषयावर का शांत आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महिला असुनही पिडीत महिलांना न्याय देण्यास सरकार असमर्थ आहे असे दिसुन येते. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. महिलांवर अत्याचार करणा-या शेख  विरोधात आज भाजप महिला मोर्चा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जाहिर निषेध करत आहोत. पश्चिम बंगाल सरकारच्या महिलां प्रती असंवेदनशील वागण्याचा  निषेध करत आहोत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदन भारतीय जनता पार्टी, धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना  देण्यात आले. निवेदन देताना भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती अस्मिता ताई कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण पाठक, जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, महिला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विद्याताई माने तालुका उपाध्यक्ष सारिका कांबळ, रोहित देशमुख यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top